… तर विखेंचा राज्यात विक्रमी मतांनी विजय निश्चित !

शिर्डी :- राज्यात अजातशत्रू म्हणून संबोधले जाणारे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा याही निवडणुकीत विजय निश्चित आहे. मात्र , जर शिर्डीतून साई संस्थानचे माजी अध्यक्ष तथा माजी आ . स्व . जयंतराव ससाणे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे यांनी उमेदवारी केल्यास येथे धक्कादायक निकाल लागू शकतो.

त्यामुळे शिर्डीतून राजश्रीताई ससाणे यांनी उमेदवारी करावी , असा जनतेचा सूर आहे . मात्र , सध्यातरी ससाणे ‘ झालं गेलं ‘ विसरून सोबत असल्याने ना . विखेंचा राज्यात विक्रमी मतांनी विजय निश्चित आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघ हा ना . विखेंचा बालेकिल्ला आहे. येथे विखे हाच पक्ष आहे. तसं विखे कुटंबाचे योगदानही मोठे आहे.

केवळ एका निवडणुकीत पिपाडा विरोधी उमेदवार असताना विखेंचा निसटता विजय झाला होता , मात्र त्यानंतर विखेंचे मताधिक्य हे वाढतेच आहे. आता , विखेंच्या भाजप प्रवेशानंतर शिर्डीचे राजकीय समिकरण बदलले आहे. त्यांचे विरोधक असलेल्या ममता पिपाडा आज भाजपाकडून नगराध्यक्षा आहेत. त्यामुळे विखेंचा प्रबळ विरोधक कमी झाल्याने त्यांची ऐतिहासिक मतांनी विजयी होण्याची तयारी सुरू आहे.

यासाठी कार्यकर्तेही मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत . ना . विखेंच्या एकहाती वर्चस्वामुळे येथे उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली आहे . मात्र , मध्यंतरी , लोकसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या काही घडामोडींमुळे शिर्डीची विधानसभेची निवडणूक चुरशीचे होण्याचे संकेत मिळाले होते त्यावेळी आ . थोरात यांनी दुरचे राजकारण करताना तशी व्यूहरचना केली होती .

खा डॉ . सुजय विखे लोकसभेसाठी भाजपात गेले असताना माजी आ . स्व . ससाणे यांचे सुपुत्र उपनगराध्यक्ष करण ससाणे हे काँग्रेसमध्येच थांबले होते आ . थोरात यांनीही त्यांना सन्मानाने पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले होते . यातून उद्याच्या विधानसभेचे गणितेही सुरू होती शिर्डीत विखेंना रोखण्यासाठी केवळ ससाणे हेच तुल्यबळ लढत देऊ शकतात , हे फक्त आ . थोरात यांनाच नव्हे , तर शिवसेनेलाही माहिती होते.

त्यामुळेच सेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी विखेंना पराभूत करण्यासाठी माजी आ . ससाणे यांनी सेनेकडून शिर्डीतून लढावे , यासाठी गेल्या पंचवार्षीकलाच आग्रह धरला होता , वास्तविकतः साई संस्थानच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांची कामे केली.

त्यातून शिर्डीसह राहाता , बाभळेश्वर परिसरात त्यांना ला मानणारा मोठा गट तयार झाला हजारो कामगारही त्यांच्यासोबत होते. येथील व्यापारी , उद्योजकही त्यांच्यासाठी अनुकूल होते . याशिवाय या मतदार संघात ‘ माळी ‘ समाजाचे निर्णायक मते असल्याने ससाणे हेच विखेंना पाडू शकतात , हे सर्वांनी हेरले होते.

मात्र , स्व . ससाणे हे निवडणूक लढले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांचे निधन झाले . परंतु , आजही स्व . ससाणे यांचे शिर्डी मतदार संघातील कार्यकर्ते आदराने त्यांची आठवण काढत असतात . त्यांच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी शिर्डीतून राजश्रीताईंनी उमेदवारी करावी , असा जनतेचा सूर होता . शिर्डीतून राजश्रीताई यांनी उमेदवारी केली . तर शतप्रतिशत धक्कादायक निकाल लाग शकला असता .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts