आ.मोनिका राजळे चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर !

अहमदनगर :- आमदार मोनिका राजळे यांनी रविवारी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

आ. राजळे यांचा लहान मुलगा कबीर यास डेंग्यू झाल्याने सध्या तो नगर येथे उपचार घेत आहे. त्या स्वतः सुध्दा आजारी असून सत्कार न घेता त्या चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर गेल्या.

बाजरीच्या कणसाला आलेले मोड, शेतात सडलेला कांदा, पाण्यात उभ्या असलेल्या कपाशीची जळुन गेलेली बोडांसाहीत झाडे, साचलेल्या पाण्यामुळे पिवळे पडलेले तुरीचे पिक, जमीनीवर सपाट झालेली चाऱ्याची पिके, वाया गेलेले सोयाबीन, मका पिक, 

तुडुंब भरल्याने कधीही फुटुन मोठी हानी करू शकतील असे माती नालाबांध व पाझर तलाव , तुडुंब भरलेल्या विहीरी , बंधारे असे अवकाळी पावसामुळे आलेले नैसर्गिक संकट चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहिल्यानंतर शेतकऱ्यांसह आमदार मोनिका राजळे यांचेही डोळे पाणावले.

आमदार मोनिका राजळे यांनी अकोला, पालवेवाडी, मोहज देवढे, जांभळी या गावाचा दौरा करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली.

अकोले येथील बाळासाहेब डुकरे यांचे पाण्यामुळे जळून गेलेले पीक, पालवेवाडी येथील राजू पालवे यांचे पाण्यामुळे वाया गेलेले कपाशीचे पीक,

हरिभाऊ कराड व साहेबराव आंधळे यांच्या शेतातील काढणीला आलेला सडलेला कांदा, देवराम पालवे यांचे भुईसपाट झालेले चाऱ्याचे पीक पाहून अमदारांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts