संगमनेर – संगमनेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले मैदानात उतरणार आहेत. शिवसेनेने बुधवारी त्यांची उमेदवारी जाहीर केली असून गुरुवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.
संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र, शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवत विखे यांना मोठा धक्का दिला.
नवले यांनी यापूर्वी जनता दलातर्फे मतदारसंघातून थोरातांना आव्हान दिले होते. आता ते पुन्हा एकदा युतीकडून आव्हान देणार आहेत. थोरातांचे कट्टर विरोधक विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून नवले यांचा परिचय आहे.