जामखेड – जामखेड येत्या पाच वर्षांत जामखेड व कर्जतचा चेहरामोहरा बदलून टाकू. पाणी, रोजगार व इतर प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी खर्डा येथील रोहित पवार यांच्या सभेत रविवारी रात्री सांगितले.
विरोधक १८ वर्षांपूर्वीचं पत्र दाखवतात, पण २००१ नंतर आमच्याच काळात गोदावरी प्रकल्प सुरू झाला, कृष्णा सीना स्थिरीकरण योजना राबवून पाणी दिलं गेलं हे मात्र विरोधक सांगत नाहीत.
पण कर्जत-जामखेडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणार, असे पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले, गेल्या ९० दिवसांपासून या परिसरात मी रहात असून तळागाळातील सर्व लहान-थोरांना भेटून त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
शिकार नाही, गेम करणार शिंदे साहेब, आपण माझ्या शिकारीची भाषा करत आहात, पण एक लक्षात ठेवा. येथील लोकांनी मला खूप आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे २१ तारखेला तुमची लोकशाही पद्धतीने शिकार नव्हे, तर गेम होणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विजयसिंह गोलेकर यांनी केले.