नगरला बदनाम करणाऱ्यांना जागा दाखवा : आ.जगताप

नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराबद्दल प्रेमाची भावना दाखविणे गरजेचे आहे. राजकीय स्वार्थासाठी नगर शहराला बदनाम करणाऱ्यांच्या पाठीमागे जावू नका, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले..

प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचा शुभारंभ भिस्तबाग चौक येथे आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे, मोहन मानधना, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, मनोज दुल्लम, सुनिल त्रिंबके, दिपाली बारस्कर, मिना चव्हाण, शितल जगताप, प्रा.माणिक विधाते, बाळासाहेब बारस्कर, निखिल वारे, शिवाजी चव्हाण, उदय कराळे, सतिष शिंदे, बाळासाहेब पवार, सतिष ढवण, स्वप्निल ढवण, अजिंक्य बोरकर, हभप तुळशीराम लबडे महाराज, बाबासाहेब गाडळकर, मायाताई कोल्हे आदींसह नागरिक उपस्थित होते..

आ.जगताप पुढे म्हणाले की, शहराचा विकास आणि तरुणांच्या हाताला काम हाच अजेंडा समोर ठेवुन आपण काम करत आहोत. केवळ निवडणुका आल्या की, कामांचे नारळ फोडायचे असे उद्योग आपण कधीच केले नाहीत. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास साधायचा आहे. 
महापौर वाकळे म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला चालना देण्याचे काम सुरु आहे. विकासासाठी आम्ही सर्वजण पक्ष विरहीत एकत्र येत आहोत. नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले की, भिस्तबाग महाल ते गजराज फॅक्टरी ते प्रोफेसर चौक या रस्त्याच्या कामासह प्रभागातील अनेक कामे या निधीतून होणार आहेत. 

तसेच सावेडीतील कचरा डेपो हटविण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे स्थायी समितीत १०० टन कचरा प्रकल्प इतरत्र चालू करण्याचा ठराव झालेला आहे. कचरा डेपोच्या जागेवर स्मशानभुमीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी आ. संग्राम जगताप यांच्यामुळे प्रभागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts