वाहनचालकांच्या 1537 पाल्यांना तीन हजारांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

अहमदनगर : अहमदनगर व बीड जिल्ह्यातील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी तर्फे गेल्या पाच वर्षापासून चालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत आहे यंदा इयत्ता आठवी ते बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.

अशा सुमारे 1537 पाल्यांचा शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला एकूण 47 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आलेशहरातील ओम गार्डन येथे शनिवारी दिनांक 21 रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके न्यू आर्ट्स कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर झावरे सर श्रीराम फायनान्स चे जोनल मेन्टोर सी. प्रवीण सर स्टेट हेड विक्रम सूर्यवंशी सर रीजनल बिझनेस हेड शशांक देशपांडे व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली गेली.

उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात निंबोडी येथील रेणुकामाता विद्यालय व कोपरगाव येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली .

1537 पाल्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली व त्यामागील मुख्य उद्देश समजून सांगितला गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेंद्र टाक यांनी मानले .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts