श्रीरामपुरात कांबळे की कानडे? उत्सुकता शिगेला…

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे त्यांच्या विरोधात कांग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांनी कडवी झुंज दिली आहे.

कांबळेंच्या पाठिशी गृहनिर्माण मंत्री ना. विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे सभापती दीपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते आदींच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. शिवाय २२ नगरसेवकांचा फौजफाटा होता. 

दुसऱ्या बाजूला कॉग्रेसचे लहू कानडे यांच्या मागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह संजय फंड, जी. के. पाटील, नानासाहेब पवार, श्रीनिवास बिहाणी, बाबा दिघे, सुधीर नवले, राजेंद्र पाऊलबुद्धे आदींसह ससाणे गटाचे शहर व तालुक्यातील कार्यकर्ते सक्रीय होते. 

कांबळेंवर गद्दारी , कमी शिकलेले आणि विकास केला नाही म्हणून प्रचारात ससाणे गटाने झोड उठविली होती. तर अति शिकलेल्यापेक्षा अडाणी बरा, बाहेरच्या पेक्षा घरच्या गाईचं गोर्ह बरं अशी टीका लहु कानडे यांच्यावर करण्यात आली. 

मात्र कांबळे गटाकडून कानडे यांच्याऐवजी ससाणे गटावरच जोरदार टीका करण्यात आली. विशेष म्हणजे आ. कांबळे आणि लहू कानडे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात जे कोणी प्रमुख कार्यकर्ते होते ते विखे समर्थक होते. त्यामुळे निकालाची उत्सुकता ताणलेली आहे. 

निवडणूक कांबळे – कानडे यांच्यात झाली असली तरी निकालानंतर प्रतिक्रिया ससाणे आणि त्यांचे विरोधी गटात उमटणार आहे हे मात्र निश्चित.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts