श्रीगोंद्यातून पुन्हा एकदा घनश्याम शेलार पराभूत !

श्रीगोंद्यात घनश्याम शेलारांचे पक्षांतर अयशस्वी झाले आहे, श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांना निसटता विजय मिळाला.

येथील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे घनशाम शेलार यांनी त्यांना तगडी लढत दिली. शिवसेनेकडून नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी मिळत नसल्याचे पाहून शेलारांनी चार-पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे हे पक्षांतर मात्र यशस्वी झाले नाही. 

पण त्यांनी दिलेली लढत संस्मरणीय ठरली. साईकृपा साखर कारखान्याच्या कारभारामुळे पाचपुते यांच्यावरोधात नाराजी होती. त्यातच शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीने शेलार यांच्यासाठी जोर लावला होता. अशा स्थितीत स्वत:ची यंत्रणा नसतानाही त्यांनी दिलेली लढत लक्षवेधक ठरली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts