महाराष्ट्र

Nhava-Sheva Atal Setu: 500 बोईंग विमान,17 आयफेल टॉवर एवढे वजन पेलण्याची क्षमता आहे या पुलामध्ये! वाचा या पुलाची वैशिष्ट्ये

Nhava-Sheva Atal Setu:- मुंबईमध्ये जे काही महत्त्वाचे असे पायाभूत प्रकल्पाचे कामे सुरू आहेत यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प आणि महत्त्वाच्या अशा मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच काही उड्डाणपूलांचे कामे देखील मुंबईत सुरु असून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा  उभारण्याकरिता या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे  मुंबईमध्ये जी काही वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीची  समस्या सोडण्यासाठी देखील हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांमधीलच बहुप्रत्यक्षित असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा सेवा अटल सेतूचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.

ट्रान्स हार्बर लिंक हा एक इंजिनिअरिंगचा चमत्कार म्हणावा असा प्रकल्प असून महाराष्ट्राच्या विकासामध्ये नक्कीच हातभार लावण्याचा दृष्टिकोनातून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या लेखामध्ये आपण याच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू विषयी माहिती बघणार आहोत.

 कसा आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प?

अटल सेतू हा शिवडी या ठिकाणी सुरू होतो व शिवडी या ठिकाणहून थेट समुद्र मार्गे चिरले गावापर्यंत म्हणजेच न्हावा शेवा पर्यंत जातो. यादरम्यान त्याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून या 22 किलोमीटर पैकी तब्बल 16.80 किलोमीटरचा रस्ता समुद्रातून जातो. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र पूल असून

जगामध्ये याचा बारावा क्रमांक लागतो. जर आपण या प्रकल्पाचे महत्त्व पाहिले तर या प्रकल्पामुळे नवी मुंबई तसेच मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ वीस मिनिटांमध्ये आता पार करता येणार आहे. या प्रकल्पाला 18000 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेले आहे.

 मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये

1- या पुलाची एकूण लांबी 21.8 किलोमीटरचे असून समुद्रावरील लांबी 16.50 किलोमीटर आहे.

2- या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला सहा लेनचा महामार्ग असून एक त्यामध्ये आपत्कालीन लेन आहे.

3-मुंबईतील शिवडी, शिवाजीनगर आणि जासई या ठिकाणी एसएच 54 आणि NH 348 वर चिरले येथे इंटरचेंज देण्यात आले आहेत.

4- तसेच ९० मीटर ते 180 मीटर लांबीचे सात अर्थोट्रापिक स्टील डेक अर्थात ओएसटी स्पॅन आहेत व ते भारतात प्रथमच पुलावर वापरण्यात आलेले आहे.

5- या पुलावरून प्रवास करायचा असेल तर 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला असून परतीच्या प्रवासाकरिता 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

6- या पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर तसेच मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई ते गोवा हायवेशी वेगवान कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे.

7- तसेच मुंबई- नवी मुंबई वरून पनवेल, अलिबाग तसेच पुणे आणि गोव्याला जे प्रवासी जातात त्यांच्याकरिता हा मार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये इंधनाची बचत तर होईलच परंतु वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

8- ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातील पहिलाच रस्ता आहे.

9- तसेच प्रत्येक 100 मीटर वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून संपूर्ण रस्त्यावर 130 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

10- सध्या जर तुम्हाला या पुलावर जायचे असेल तर ते शिवडी आणि फ्री वे येथून जाता येते.

11- तसेच या पुलावर विशिष्ट अंतरावर स्पीडोमीटर लावण्यात आलेले असून यामुळे वाहनांचा वेग आणि मर्यादा लक्षात येते. या पुलावर काही ठिकाणी शंभर किलोमीटर प्रति तास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किमी प्रति तास अशी वेगमर्यादा आहे.

12- महत्त्वाचे म्हणजे या पुलावर तुम्हाला टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही. कारण या ठिकाणी ओपन रोड टोलिंग सुविधा देण्यात आलेली आहे.

 या पुलाचे आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये

1- या सागरी पुलासाठी ऑर्थो ट्रापिक  स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

2- पृथ्वीच्या सात प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर करण्यात आला आहे.

3- 17 आयफेल टॉवर आणि पाचशे बोईंग विमान इतके वजन पेलण्याची क्षमता ट्रान्स हार्बर लिंकमध्ये आहे.

4- हा पूल देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल आहे व लांबीचा निकष पाहिला तर जगातील दहाव्या क्रमांकाचा फुल आहे.

5- यामध्ये 84 हजार टन वजनाचे 70 डेक वापरण्यात आलेले आहेत.

Ajay Patil

Recent Posts