नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील बेरोजगारांसाठी नोकरी मेळावा

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील बेरोजगारांसाठी १४ जुलैला सुपे येथील सफलता मंगल कार्यालयात नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात ८ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओटोमोबाईल, फायनान्स, बँकिंग, सिक्युरिटी, हॉस्पिटल, विमा, आयटी आदी क्षेत्रांतील ७५ मल्टीनॅशनल कंपन्यांशी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करार करण्यात आला असून संबंधित अधिकारी मुलाखती घेऊन नियुक्ती करणार आहेत.

आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले अकुशल कामगार, दहावी-बारावी झालेले कुशल कामगार, इंजिनिअरिंगमधील पदवी, पदविका घेतलेले अभियंते, कृषी, अर्थ विभागात पदवी घेतलेल्या तरुणांसाठी या मेळाव्यात रोजगार उपलब्ध होणार आहे. निवृत्त सैनिकांना सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येईल. इच्छुकांनी नीलेश लंके डॉट जॉबशोकेस डॉट इनवर नोंदणी करायची आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts