Railway News : अखेर बुधवारी (२३ ऑगस्ट) दुपारी १२.०८ सुमारास निजामाबाद ते दौंड एक्सप्रेस कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर थांबली आणि निजामाबाद एक्सप्रेसला थांबा देण्याची वारी ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली.
वारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कान्हेगावचे स्टेशनमास्तर सी.बी.शर्मा, रेल्वेगाडीचे चालक प्रधान कांटावाला, गार्ड तसेच गणेश आबक यांचा सत्कार करण्यात आला.
निजामाबाद एक्सप्रेसला कान्हेगाव थांबा मिळावा यासाठी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले. कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर दौंड- निजामाबाद एक्सप्रेस, निजामाबाद- दौंड एक्सप्रेस, पुणे-मनमाड- निजामाबाद, निजामाबाद – मनमाड-पुणे, कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस व गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेगाड्या थांबत नसल्यामुळे कान्हेगाव, वारी व पंचक्रोशीतील रहिवासी, शेतकरी, कामगार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत होती.
त्यामुळे कान्हेगाव रेल्वेस्टेशनवर वरील रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी माजी सभापती मच्छिद्र टेके पाटील, तत्कालीन सरपंच सतीश कानडे, माजी तत्कालीन उपसरपंच मनीषा गोर्डे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी माजी आ. कोल्हे यांच्याकडे केली होती.
यावेळी वारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश कानडे, सुभाषराव कर्पे, नामदेवराव जाधव, स्मिताताई काबरा, हिम्मतराव भुजंग, राहुल शिंदे, दिलीप गडकरी, वसंतराव टेके, रावसाहेब गोर्डे, बद्रीनाथ जाधव, रामप्रसाद खवले, हरिभाऊ टेके, सर्जेराव टेके, सुखदेव मुसळे, सतीश मैराळ, मकरंद देशपांडे, गोपाल करवा,
राजेंद्र वरकड, गणेश भाटी, भगवान पठाडे, राजेंद्र परदेशी, विश्वास तपासे, शब्बीर तांबोळी, विलास गोंडे पाटील, विजय जाधव, महेंद्र गडकरी, सिकंदर पठाण, सचिन भारूड, दादासाहेब संत, राजेंद्र पांडे आदींसह कान्हेगाव, वारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रेल्वे कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.