Maharashtra Politics : राजकारणातील आगामी घडामोडींवर सूचक भाष्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. यामध्ये त्यांनी अनेक नेत्यांनाही टॅग केले असल्याने त्याची वेगळी चर्चा सुरू आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..” (आता सगळ्यांनाच सगळ्यांपासून धोका आहे). त्यांच्या या ट्विटमागचा नेमका अर्थ काय? यामागे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रियांका गांधी यांना टॅग केले आहे. राऊत यांनी या ट्विटच्या माध्यमातून बंडखोरांना सूचक इशारा दिला आहे का, असाही अर्थ काढला जात आहे.
महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीही संजय राऊत हे दररोज गूढ आणि सूचक अर्थाची शेरोशायरी करत होते. आताही राज्यातील राजकारण निर्णायक टप्प्यावर असताना संजय राऊत यांनी अशाचप्रकारे ट्विटस करायला सुरुवात केली आहे.