Health News:कोरोना संसर्गावर पुरेसे नियंत्रण मिळालेले नसताना राज्यात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. पालघर येथील गिरगाव आश्रम शाळेतील १५ विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.
जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत जुलैच्या पहिल्या १७ दिवसांत ११ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, गिरगाव आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.
गिरगाव आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. आजारी असल्याने २२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ मुली आणि एक मुलगा अशा १५ विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीअंती समोर आले.
स्वाईन फ्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांची उपचारानंतर प्रकृती स्थिर असून खबरदारी म्हणून त्यांना वसतीगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.