महाराष्ट्र

उसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअपची धडक एक ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- उसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअपच्या धडकेत पिकअपचा क्लिनर राहुल पाटील (वय २७) हा जागीच ठार झाला. तर चालक प्रभाकर सुरेश पाटील (वय ३४, जळगाव) हा जखमी झाला.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुंजाळवाडी येथील हॉटेल जत्रा जवळील पुलावर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. ट्रॅक्टर (एमएच १७ एव्ही ८२५७) वरील चालक संभाजी चिमाजी दाळे (देसवडे, ता. पारनेर) हा उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन नाशिकला चालला होता.

मागून येणारा पिकअपने (जीजे ०५ बी. व्ही. ८२१२) ट्रॅक्टरला धडक दिली. क्लिनर राहुल पाटील हा जागीच ठार झाला. चालक प्रभाकर सुरेश पाटील जखमी झाला.

माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी येत जखमीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts