महाराष्ट्र

Mhada News : म्हाडाच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील गृहनिर्माण योजनेअंतर्गत घर घेण्याची संधी ! वाचा कुठे आहेत किती घरे?

Mhada News:- म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांना मुंबई तसेच पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि पिंपरी चिंचवड यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या विक्रीकरिता लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते.

अगदी याच पद्धतीने जर आपण पिंपरी चिंचवड तसेच पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून 5863 सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे व त्याकरिता संगणकीय सोडत आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचेच महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

म्हाडाच्या घरांकरिता तब्बल 73 हजार अर्ज दाखल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या पुणे, कोल्हापूर, सोलापूर तसेच सांगली व पिंपरी चिंचवड या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 5863 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत आयोजित करण्यात येणार असून याकरिता तब्बल 73 हजार पेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या प्राप्त अर्जांपैकी 51 हजार अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे या आकडेवारीवरून दिसून येते की या सदनिकांच्या संगणकीय सोडतिला अर्जदारांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे.

आज म्हणजेच 31 ऑक्टोबर पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. अर्जदार एनएफटी किंवा आरटीजीएसच्या माध्यमातून देखील बँकेतून या अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत.

कुठे आहेत किती सदनिका?

यामध्ये पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ व सांगली जिल्ह्यातील 32 तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. तसेच या सोडतीमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका,

प्रधानमंत्री आवास योजना( शहरी) अंतर्गत येणाऱ्या 431 व 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिकांचा यामध्ये समावेश आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेच्या माध्यमातून 2445 सदनिका देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

असे असणार आहे सोडतीचे वेळापत्रक?

याकरिता पुणे येथील कार्यालयात 24 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोडत काढली जाणार असून या सोडतीकरिता जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्यांची प्रारूप यादी आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीकरिता जे काही अर्ज स्वीकृत करण्यात आलेले आहे त्यांची अंतिम यादी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil
Tags: MHADA News

Recent Posts