… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला आवर्जून सांगितले होते . की तुम्ही मंत्रीपद आणि नगर जिल्हा आता सांभाळा .

विधानसभेच्या निवडुकीत आमचा भैय्या पराभूत झाला नाहीतर अनिल भैय्याचं कॅबिनेट मंत्री होणार होते . तुम्ही नगरला गेलात की अनिल भैय्या यांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्यासोबत जिल्ह्याची पुनर्बांधनी करा असा आदेश उद्धव साहेबानी दिला होता. दिवंगत माजी आमदार हिंदू धर्मरक्षक अनिल भैय्या राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगरमध्ये बुरूडगाव रोड वरील नक्षत्र लॉन येथे सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत समारोपाचे सात्वनपर भाषण ना. गडाख यांनी केले . राज्य आणि देशातील मान्यवर नेतेमंडळींनी ऑनलाईन व्हिडीओ आणि ऑडिओ संदेश पाठवून भैय्याविषयी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली . यावेळी उपस्थित श्रीमती शशिकला अनिल राठोड , विक्रम राठोड तसेच राठोड परिवाराचे सांत्वन करण्यात आले. यावेळी बोलताना ना . गडाख पुढे म्हणाले कि अत्यंत निर्मल मनाचे अनिल भैय्या होते .

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव साहेबानी सांगितल्याप्रमाणे आपण भैय्या साहेबांना भेटलो . प्रतिस्पर्धी आपल्या पुढे जात असेल तर माणसाला खपत नसते . पण भैय्यांचा स्वभाव तसा नव्हता . त्यांनी दिलखुलासपणे आपण वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले होते . त्यांच्या अकाली निधनाने आता आपल्याला त्यांचे मार्गदर्शन मिळणार नाही तरीदेखील आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या कुटुंबाच्या अडचणी सोडविण्यासाठी ज्यांनी हयात खर्च केली .

त्या अनिल भैय्यांच्या शिकवणी प्रमाणे आपल्याला राठोड कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . राठोड कुटुंबियांना मी सांगू इच्छितो की आपण पोरके नाहीत आम्ही तुमच्या सोबत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि दिवंगत आ . अनिल भैय्या राठोड यांच्या प्रतिमेला फुले वाहून शंकरराव गडाख यांनी श्रद्धांजली अर्पण केली . यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगर संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर ,

माजी आ . विजयराव औटी , माजी खा . चंद्रकांत खैरे , शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा . शशिकांत गाढे , उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे , शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर , भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे , जेष्ठ नेते अभय आगरकर , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके , काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण , माजी महापौर अभिषेक कळमकर , प्रसिद्ध हृदय रोग तद्न्य डॉ . बापूसाहेब कांडेकर ,

दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक ऍड , डॉ . बाळ ज बोठे पाटील , अहमदनगर प्रेस क्लब चे अध्यक्ष शिवाजी शिर्के , पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा , प्रथम महापौर भगवान फुलसौंदर , शहर प्रमुख दिलीप सातपुते , शिवसेना उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव , माजी महापौर सुरेखा कदम , एम आय एम चे सचिव , डॉ. सचिन वहाडणे , माजी कुलगुरू डॉ . सर्जेराव निमसे , तसेच सर्वपक्षीय नेते तसेच विविध क्षेतत्रातील मान्यवर हजर होते .

यावेळी अनिल भैय्या यांच्या जीवनाचा संघर्षमयी प्रवास सांगणारी मेट्रो न्यूज ने तयार केलेली एक लक्षवेधी ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. हा सर्व कार्यक्रम निमंत्रितांसाठी होता . त्यामुळे या सभेचे शिवसेना नगर या फेसबुक पेजवरून थेट प्रसारण करण्यात आले होते . अनिल भैय्यांचे हजारो चाहत्यांनी हा कार्यक्रम ऑन लाईन पहिला . त्यांनी या लाईव्ह प्रसारणावेळी खाली कॉमेंट बॉक्स मध्ये त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून आपले भैय्याविषयीचे विचार व्यक्त केले.

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेच्या उप सभापती ना. निलमताई गोर्हे , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ , बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव ,

शिवसेनेचे सचिव अनिलजी देसाई , ना. एकनाथ शिंदे , भाजपचे जेष्ठ नेते एकनाथरावजी खडसे , केंद्रीय मंत्री ना . नितीन गडकरी , पुण्याचे खा. गिरीश बापट आदींनी मोबाईलवर ऑनलाईन व्हिडीओ शोक संदेश पाठवले होते. ते एल ई डी स्क्रीन वर दाखवण्यात आले . यावेळी रामकिशन धनवट , एड बाळासाहेब पवार , राजेंद्र गांधी , शिवाजीराव साबळे , राजेंद्र भगत , शैलेश मुनोत , विठ्ठलराव गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts