Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकरी पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा अधिक विश्वास ठेवतात. गेल्या वर्षी मात्र पंजाब रावांचे हवामान अंदाज फेल ठरले होते. एकही अंदाज खरा ठरत नव्हता. यंदा मात्र पंजाबरावांचे कोणतेच अंदाज फेल ठरलेले नाहीत.
यावर्षी पंजाब रावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजा बाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाढू लागली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाब रावांनी सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज दिला होता. एक सप्टेंबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आणि पाच सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पाऊस बरसणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला होता.
यानुसार महाराष्ट्रात एक आणि दोन सप्टेंबरला मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. म्हणजेच पंजाबरावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक धरणांमधील पाण्याची पातळी देखील वाढली आहे. त्यामुळे राज्यातील काही प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पंजाब रावांनी जायकवाडी धरण येत्या काही दिवसात शंभर टक्के भरेल असे म्हटले होते. यानुसार आता जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत आहे. अशातच आता पंजाबरावांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे.
पंजाब रावांचा नवीन अंदाज काय म्हणतोय
पंजाबरावांच्या नवीन हवामान अंदाजानुसार, आजपासून मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. खरे तर मराठवाड्यात आज आणि उद्या पाऊस होईल पण एक आणि दोन तारखेला जसा पाऊस झाला होता तसा पाऊस होणार नाही.
म्हणजेच येथील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. पण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या या भागात मोठा पाऊस होणार आहे.
आज तीन आणि उद्या चार सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे.
यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने अधिक सतर्क रहाणे आवश्यक आहे. विशेषता जे लोक नदीकाठी वास्तव्याला असतील त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण की नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. यामुळे जे लोक नदीकाठी राहत असतील त्यांनी काळजी घ्यावी.