महाराष्ट्र

Parliament Budget Session : दुसऱ्या टप्प्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर बॉम्ब फुटणार !

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) चालू आहे. आज दुसरा टप्पा चालू होणार असून सरकारपुढे मोठे आवाहन असणार आहे. तसेच आज विरोधक सरकारच्या विरोधात पेटून उठण्याची दाट शक्यता आहे.

या अर्थसंकल्पात विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच आज महत्वाच्या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात असे मुद्दे असतील.

तसेच अधिवेशनात युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukrine) अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळवणे तसेच जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प सादर करणे हे सरकारच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी असेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सोमवारी जम्मू आणि काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करतील. दुपारच्या जेवणानंतरच्या कामकाजादरम्यान सभागृहात त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts