महाराष्ट्र

Anganwadi Strike : २६ हजार पगार द्या ! ..अन्यथा अंगणवाडी सेविका व कर्मचारी संपावर जाणार

Anganwadi Strike : चिमुरड्यांचं शिक्षणाच्या हिशोबाने पहिलं पाऊल पडत ते अंगणवाडीमध्ये. अंगणवाडी कर्मचारी, सेविका आदी त्यांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने पहिले प्रयत्न करतात. परंतु या सेविका, कर्मचाऱ्यांवर मात्र वांरवार आंदोलनेच नशिबी आहेत असे वाटायला लागले आहे.

मागील काही आंदोलनात केवळ आश्वासने मिळाली,त्यामुळे आता प्रलंबित प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराच संघटनेन दिलाय. मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर पंचायत समितीच्या मुख्यद्वारावर ठिय्या देत घोषणाबाजी केली.

काय आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. त्यापैकी काही म्हणजे

– सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजाणी करणे

– अंगणवाडी सेविका व मिनी सेविकांना दरमहा २६ हजार तर मदतनिसांना २० हजार रुपये मानधन द्या.

– महागाई निर्देशांकाला जोडून दर ६ महिन्यांनी मानधनात वाढ करा

– विना योगदान मासिक निर्वाह भता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजूर करा.

– मनपा हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यासाठी ५ ते ८ हजार भाडे मंजूर करा

– आहाराचा दर सर्वसाधारण १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करा

२ लाख कर्मचारी संपात सहभागी होणार

राज्यभरातील सुमारे २ लाख कर्मचारी संपात सहभागी होतील असे म्हटले आहे. संपादरम्यान मासिक प्रगती अहवाल, बैठका व अन्य माहिती देण्यावर बहिष्कार टाकणार आहेत. मागण्यांचा शासन पातळीवर विचार जर झाला नाही तर संप अटळ असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts