महाराष्ट्र

Petrol And Diesel : एक लिटर पेट्रोलसाठी आपल्याला किती रू कर भरावा लागतो? जाणून घ्या सविस्तर गणित

Petrol And Diesel : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना लोकांना प्रवास करणे महाग झाले आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्ह्णून लोक इलेक्ट्रिक व CNG वाहने खरेदी करत आहेत.

मात्र पेट्रोल व डिझेलच्या दरांबाबत विचार केला तर एक लिटर पेट्रोलसाठी आपल्याला किती रू कर भरावा लागतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण आपण पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेलो तर सहज 100-200, रुपये,500 -1000 च पेट्रोल किंवा डिझेल भरत असतो.

दरम्यान, आता सद्या मुंबई मध्ये 106.86 रुपये प्रति लिटर किंमत आहे. ही याची मूळ किंमत नाही तर यावर अनेक प्रकारचे टॅक्स लावलेले असतात. हे सर्व टॅक्स लाऊन ग्राहक पर्यंत वस्तू येत असते. या पैकी किती टॅक्स हा सरकार ला पोहोचतो हे जाणून घ्या.

केंद्र शासन आणि राज्य शासन पेट्रोल आणि डिझेल यांचे उत्तप्न हे कर वर अवलंबून असते. सरकारची तिजोरी ही यावरच अवलंबून असतं. देशातील प्रमुख तेल कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम हे सर्व मिळून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव ठरवतात. पेट्रोल-डिझेल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. यावरच सरकारची तिजोरी भरत असते.

सरकारी माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारने 2022-23 च्या 9 महिन्यांत पेट्रोलियम उत्पादना मधून जवळपास 545,002 कोटी रुपये उत्पन्न मिळवले. त्याचबरोबर 2021-22 या वर्षात 774,425 कोटी रुपये, तसेच 2020-21 मध्ये 672,719 कोटी रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या करमधून कमावले आहेत.

एक लिटर पेट्रोलसाठी किती रू कर?

एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकार आपल्याकडून किती कर घेतं या विषयी माहिती घेऊया. 1 मे 2023 या दिवशी दिल्ली मद्ये एक लिटर पेट्रोल करीता 96.72 रुपये होते. यामध्ये 35.61 रुपये एवढा तर कर जातो.

या करापैकी 19.90 रुपये केंद्र सरकारला आणि 15.71 रुपये राज्य सरकार ला मिळतो. याशिवाय एक लिटर पेट्रोल मध्ये डीलरचे कमिशन 3.76 रुपये ठरलेले आहे. इंधन वाहतुकीसाठी 0.20 पैसे जातात. अशा प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इंधनामधून किमतीच्या 50% कर भरावा लागतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts