Petrol Diesel Price : आज 6 मार्च 2023 असून आज होळी हा सण आहे. अशा वेळी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
कारण भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सोमवार, 6 मार्च 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अशाप्रकारे आज सलग 286 वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा दर
सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
सर्वात महाग पेट्रोल-डिझेल
राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.