Petrol Price Today : आज 19 जानेवारीसाठी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले आहेत. या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त
गुरुवारी सकाळी ब्रेंट क्रूड $0.60 घसरून $84.38 प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, WTI क्रूड $ 0.76 ने घसरून $ 78.72 प्रति बॅरलवर पोहोचले. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 57 पैशांनी घसरून 105.96 रुपये प्रतिलिटर झाला आहे.
तर डिझेल 54 पैशांनी घसरून 92.49 रुपये प्रतिलिटर झाले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात पेट्रोलचा दर 30 पैशांनी कमी झाला असून तो 109.70 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचप्रमाणे डिझेल 28 पैशांच्या घसरणीसह 94.89 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पेट्रोल स्वस्त नाही
राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यूपीमध्ये डिझेल 25 पैशांनी कमी झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी घसरले आहे.
दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल किरकोळ महाग झाले आहे. चेन्नईतही पेट्रोल-डिझेल वाढले आहे. याआधी कच्च्या तेलात प्रचंड चढ-उतार होऊनही, तेलाच्या किमतीत फार दिवसांपासून फारशी वाढ झालेली नाही.
शहर आणि तेलाच्या किंमती (पेट्रोल-डिझेलची किंमत 19 जानेवारी 2023)
– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर
– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.64 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– लखनौमध्ये पेट्रोल 96.44 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लिटर
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
– पाटण्यात पेट्रोल 108.12 रुपये आणि डिझेल 94.86 रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
दरम्यान, देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. गेल्या वर्षी 22 मे रोजी तेलाच्या किमतीत मोठा बदल झाला होता. त्यावेळी सरकारने 100 रुपयांच्या पुढे गेलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.