Ahmednagar News : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
परिणामी, गेल्या आठवड्यातील पेरण्यांचा आकडा शून्यावरून सात टक्क्यांपर्यंत पुढे सरकला आहे. चालू आठवड्यात होणाऱ्या पावसावर पुढील पेरण्या अवलंबून आहेत. अवेळी झालेल्या गारपिटीने शेतपिकांची नासाडी केली. झालेल्या नुकसानातून शेतकरी अजून सावरू शकलेले नाहीत.
पावसाचा हंगाम सुरू झाला होऊन महिना उलटूनही दमदार पाऊस मात्र झालेला नाही. गेल्या सप्ताहात आर्द्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावत काहीसा दिलासा दिला. पण, त्यात अवघ्या सात टक्केच पेरण्या होऊ शकल्या आहेत. अजून ९३ टक्के पेरण्या बाकी असून, ढगाळ वातावरणामुळे आज ना उद्या पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
गेल्या आठवड्यात पावसाने महिनाभराच्या तुलनेत समाधानकारक हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांसह नदी-नाले आणि जलस्रोतांमध्येही पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली. सोमवार (दि. ३) पासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महिनाभरापासून खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग आला आहे.
इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस नसल्याने भात लागवडीस सुरुवात झालेली नाही. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस आणि मका ही पिके वगळता प्रत्यक्ष खरिपाच्या पेरण्या झाल्याच नव्हत्या.
या महिन्यात सिन्नर, सुरगाणा, नांदगाव आणि मालेगाव या चारच तालुक्यांमध्ये सुमारे ५८४.९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यानंतर चार दिवस पाऊस झाल्याने सोमवारपर्यंत जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये ४४ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे एकूण लागवडीच्या उद्दिष्टापैकी ६.८८ टक्के क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत.