PM KISAN : भारतात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी PM KISAN ही योजना चालू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 13 हप्ते मिळाले आहेत. आता 14 वा हफ्ता शेतकऱण्याच्या खात्यात जमा होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे 14 वा हप्ता मे अथवा जून या महिन्यात शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. या करीता केंद्र सरकारने त्या बाबतीत पूर्ण तयारी केली आहे.
परंतु, याबाबत अजुनही या बाबतीत नक्की नाही नाही. याचाच अर्थ असा की अजूनही, सरकार कडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक विषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन वेळा 2000 रुपये प्रमाणे तीन हप्ते प्रत्येक वर्षी 6000 रुपये थेट जमा करते.
केंद्र शासनाने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून या प्रकारची योजना चालू केली होती. सरकार शेतकऱ्यांना 1 वर्षामध्ये 3 हप्त्यांत 6,000 रुपयांची थेट आर्थिक मदत करते. प्रत्येकी 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर 2,000 रुपये टाकले जातात. आजपर्यंत सुमारे 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेय.
शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये –
PM kisan निधीचा ज्या शेतकऱ्यांना अजूनही 13व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात दोन हप्त्यांचे एकदमच पैसे येतील. म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील.
काही शेतकरी हे आपले व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना pm kisan Sanman nidhi चा 13व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. मात्र, आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी त्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना आता दोन्ही हप्ते एकदम दिले जाणार आहेत.
अशा प्रकारे चेक करा आपल स्टेटस –
Pm किसान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ वर शेतकरी आपले स्टेटस पाहू शकतात. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या अकाऊंट वर पैसे येतील की नाही हे सुध्दा त्यांना पाहता येईल. स्टेटस चेक करण्यासाठी, आपल्याला पीएम किसानच्या http://pmkisan.gov.in/ ya अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यांनतर वेबसाइटवरील फार्मर्स कॉर्नरवर ऑप्शन वर जाऊन बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय निवडा. या पेजवर, विचारलेली माहिती पूर्ण भरा. यानंतर आपण आपले स्टेटस चेक करू शकतो.
बेनिफिशियरी स्टेटस –
बेनिफिशियरी स्टेटसमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना खात्याचे संपूर्ण डिटेल्स दिलेले असतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, त्याच्या बँक खात्यात पैसे किती तारखेला जमा झाले आहेत, त्याचे कोणतेही हप्ते अडकले आहेत तर त्याचे कारण काय आहे, त्यांचे आधार कार्ड व्हेरिफाय झाले आहे की नाही. अशी माहिती यामध्ये दिलेली असते.