PM Kisan Yojana : जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच तुमच्या खात्यात पुढील हफ्ता जमा होणार आहे.
या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच मे 2023 पर्यंत, सरकार या योजनेच्या हप्त्यातील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकू शकते. मात्र, पुढील हप्ता कधी जाहीर होणार, याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने अद्याप केलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात 13 व्या हप्त्यातील 16,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहे.
दरम्यान, 13 वा हप्ता 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. केंद्र सरकार वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतो. यामुळे सरकारने पाठवलेल्या पैशात कोणीही फेरफार करू शकत नाही. या योजनेत अजूनही नोंदणी सुरू आहे.
याप्रमाणे लाभार्थ्यांची यादी पहा
ज्या शेतकऱ्यांनी 13 व्या हप्त्यानंतर नोंदणी केली आहे आणि ते या योजनेशी आधीच जोडलेले आहेत, त्यांना पुढील हप्ता मिळेल की नाही हे सहज कळू शकते. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध लाभार्थ्यांची यादी पाहून, तुम्हाला 14 व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळतील की नाही हे कळू शकते.
याप्रमाणे ऑनलाइन हफ्ता शोधा
जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि त्यात इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल, तर तुम्ही घरबसल्या PM किसान 2023 च्या नवीन यादीत तुमचे नाव तपासू शकता. लाभार्थी यादी पाहणे खूप सोपे आहे.
– सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
– येथे फार्मर कॉर्नर अंतर्गत लाभार्थी यादी पर्याय आहे.
– लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
– नवीन पेज उघडेल. यामध्ये प्रथम राज्य, नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गाव निवडा.
– मागितलेली सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा.
– असे केल्याने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.
– ही यादी पाहून तुमचे नाव लाभार्थी शेतकर्यांमध्ये आहे की नाही हे कळू शकते.