महाराष्ट्र

Maratha Reservation : शेकडो युवकांना घेऊन उद्या पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसणार आणि…

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहचला आहे. आरक्षणविषयी राज्य व केंद्र सरकार गंभीर नाही. त्यामुळे उद्या शिर्डी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणांना घेऊन जाहीर सभेत घुसून जाब विचारण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले आहे, मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहचला आहे. निराशेच्या भावनेतून मराठा तरूण आत्महत्या करत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील सभेत मराठा आरक्षण विषयावर जाहीर भूमीका मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा.

कायद्याच्या चौकटीत टिकणारे मराठा आरक्षण देण्याची हमी देऊन समाजास आश्वस्थ करावे. त्या दृष्टीने भाजपा नेत्यांनी तशी आग्रही भूमिका मोदींकडे करावी.

तसे झाले नाही तर शेकडो मराठा तरुणांना घेऊन सभेत घुसून त्यांना जाब विचारला जाईल असे म्हटले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts