अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी आहोरात्र मेहनत घ्यावी लागत आहे.
मात्र कोठेही काही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांकडून तातडीने त्याविरोधात कारवाई केली जाते. अशीच की कारवाई नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्यातल्या नजिक चिंचोली इथं राहत असलेल्या योगेश शिवाजी चावरे याला अवैधरित्या तलवार बाळगल्याच्या आरोपावरून नेवासा पोलिसांनी नुकतीच अटक केली.
पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरिक्षक भरत दाते आणि अन्य कर्मचाऱ्यांनी गेवराई (ता. नेवासा) येथे चावरेच्या मुसक्या आवळल्या.
पोलिस उपनिरिक्षक भरत दाते यांच्यासह पो. कॉ. सुहास गायकवाड, संभाजी गर्जे, बबन तमनर, वसिम इनामदार, गणेश इथापे, कुंढारे, महेश कचे, होमगार्ड मोहन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत ८ इंच पितळी मूठ आणि नक्षी असलेली ३२ इंच लांब पाते असलेली टोकदार लोखंडी तलवार या हत्यारासह चावरेला मुद्देमालासह अटक करण्यात आली.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप शेवाळे आणि पोलिस हवालदार भागवत शिंदे हे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved