श्रीगोंदे :- ‘ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांनी चार वर्षांत तालुक्यात काय कामे केली? भाजपच्या विकासकामांचे श्रेय घेऊन राष्ट्रवादी स्वत: कार्यसम्राट म्हणून घेत आहे, हे जनता ओळखून आहे.’
‘सध्या आमदार नसलो तरी जनतेच्या जोरावर चाळीस वर्षे राजकारणातील संपर्क कामाला येत आहेत. त्यातून तालुक्यात विकासकामे करता येत आहेत.
सध्या तर राज्यात व केंद्रात आपलेच सरकार असल्याने तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला,’ असे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.
मात्र, या कामांचे श्रेय तालुक्याच्या कार्यसम्राटांनी घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लागवला.
श्रीगोंदे तालुक्यातील सांगवी दुमाला येथे नगर-दौड रोड ते सांगवी गाव या दोन कोटी ७६ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.