मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.

अहमदनगर :- धनगर समाज़ाला आरक्षण मिळण्यासाठी लवकरच जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी दिली.

धनगर आरक्षण व सध्याची राज़कीय परिस्थिती, यावर विचारविनिमय करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाची बैठक पार पडली, या वेळी ते बोलत होते.

 

धनगर समाजाच्या लोकांना ‘अनुसूचित जमाती’चे प्रमाणपत्र द्यावे.

ते पुढे म्हणाले, धनगर समाजाला राज्यघटनेत अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ वर ‘धनगड, ओरॉन’असे नाव आहे.

परंतू हा शब्द अपभ्रंश (स्पेलिंग मिस्टेक) असून, महाराष्ट्र शासनाने ‘धनगड’ म्हणजेच ‘धनगर’ होय अशी त्वरित दुरुस्ती करून धनगर समाजाच्या लोकांना ‘अनुसूचित जमाती’चे प्रमाणपत्र द्यावे, ही कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे.

‘अभी नही तो कभी नही’ 

सामान्य धनगर समाजानेच आता आंदोलनात उडी घेतली आहे.’अभी नही तो कभी नही’ यावर धनगर समाजाच्या लोकांचे ठाम मत झाले आहे. मराठा आरक्षण देण्यामध्ये जशी देवेंद्र फडणवीस यांनी चलाखी दाखवून १६ टक्के मराठा आरक्षण लागू केले तसेच ‘धनगर आरक्षण’ लागू करावे.

 

फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.

आतापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवल्याची भावना समाजबांधवांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकाही आमदार वा खासदाराने सभागृहात चोंडी येथील धनगर आरक्षण आंदोलन व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत धनगर समाजाची बाजू मांडली नाही.

यावरून लोकप्रतिनिधी धनगर समाजाच्या प्रश्नावर उदासीन दिसतात. सरकारने धनगर आरक्षण त्वरित लागू करावे, यासाठी राज्यभर धनगर समाज आंदोलनात उतरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts