खा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावा !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खा. दिलीप गांधी यांना भाषण करण्यापासून रोखणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा बेरकीपणा याची देही याची डोळा ‘सर्वांनीच अनुभवला.

प्रा. बेरड यांच्या या बेरकीपणामुळे खा. गांधी समर्थक चांगलेच भडकले आहेत. बेरडने गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बेरड जिल्हाध्यक्ष असताना खा. दिलीप गांधी यांच्या बाजूने नव्हे ते तर पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. खा. गांधी केंद्रीयमंत्री पद भूषविले असून ते पंधरा वर्षापासून खासदार आहेत.

गांधी यांनी भाजप पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करतात.केंद्र व राज्याचे भाजपाचे जे जे कार्यक्रम असतात ते सर्व कार्यक्रम गांधी शहरासह जिल्ह्यात राबवितात. 

मात्र बेरड जिल्हाध्यक्ष असताना कोणताही कार्यक्रम पार पाडले नाही तसेच मेळाव्यासह शाखा देखिल ग्रामीण भागात उघडता आला नाही.

तसेच कोणाचा ही भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यात बेरडला जमले नाही. बेरडचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर कोणतेही ठोस काम नाही तर त्यांच्या गाडीत कार्यकर्ते बसायला तयार होत नाही.

File Photo Bhanudas Berad

कार्यकर्ते बेरडकडे नसल्याने एकटेच बेरड गाडीत फिरतात अशी अवस्था असताना मोदींच्या सभेत खा. गांधींना बोलू दिले नाही.

गांधी बोलले तर ते विकासाचे बोलतील आणि बरेड यांची नामुष्की होईल या भितीने गांधींना बोलू दिले नाही.

नगर तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत बरेड यांच्या बंधूचा पराभव झाला असून बेरड हे बंधूना ग्रामपंचायतीत निवडूण आणू शकत नाही.

बेरडने संघटन उभे केले नाही त्या बेरडने खा. गांधी यांना मोदींच्या सभेत बोलू दिले नसल्याचे खा. गांधी समर्थक बोलतात.

File Photo MP Dilip Gandhi

ओबीसी आणि अल्पसंख्यांक एकत्र आणि मराठा असे दोन गट भाजपात निर्माण झाले असून मराठा गटाचे नेतृत्व बेरडसर करत असून ते आ. कर्डिलेच्या पाठिंबावर करत आहेत.

समित्या आणि कमिट्या, नियोजन मंडळ या सर्व नियुक्त्यामध्ये सर्वाधिक मराठा समाजाला प्रतिनिधित्व बेरड़ देत असल्याचे दिसून येते.

मोदीच्या सभेत खा. गांधी बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर विकासाचे कामाविषयी माहिती देत असताना बेरड यांची चिट्ठी दिली.

त्यानंतर ते चिडले आणि म्हणाले मी बोलणार आहे दहा मिनिटे, कुणी आले नाही, अस का करता, मला बोलू देणार नाही का, तुम्ही बोला असे म्हणत गांधी भाषण थांबवित खाली उतरले, त्यानंतर डॉ. विखे यांनी गांधी पुन्हा बोला असे सांगितले.

हा सगळा प्रकार घडल्यानंतर गांधी समर्थक सभेतून निघून गेले. बरेडने कुणी सांगितले म्हणून गांधींचे भाषण बंद करण्यासाठी चिट्ठी दिली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/04/12/politics-mp-gandhi-1211/
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Dilip Gandhi

Recent Posts