अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी पूर्ण झाली.(Nitesh Rane)
मात्र, कोर्टाने यावर सुनावणी आज करण्यास नकार दिल्याने याची सुनावणी उद्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. मंगळवार दुपारपासून नितेश राणेंच्या जामीनअर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे.
मंगळवारी कोर्टाची वेळ संपल्यामुळे बुधवारी पुन्हा या युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली होती. आज खरंतर नितेश राणेंच्या जामीनअर्जावर नेमका काय निर्णय होतो, हे स्पष्ट होणं अपेक्षित होतं.
मात्र अखेर आता गुरुवारी या जामीनअर्जावरचा निर्णय कोर्ट जाहीर करणार आहे. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील या दोघांचाही युक्तिवाद आता पूर्ण झाला असून
उद्या नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार, याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या गुरुवारी वेळ मिळाल्यावर या सुनावणीवर निर्णय घेतला जाईल,
असे कोर्टाने सांगितले. ज्यांच्यावर हल्ला झाला ते संतोष परब कोर्टातून बाहेर पडताना माध्यमांसमोर आले मात्र त्यांनी बोलण्यास पूर्णपणे नकार दिला.