महाराष्ट्र

सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर दारूबंदी आंदोलन व वारकरी संघाने घेतला ‘हा’ निर्णय..!

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- सरकारने जरी सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्याची परवानगी दिली. तरी नगर जिल्ह्यातील अकोला येथील सुपर मार्केट चालकांनी आपल्या दुकानात वाईन विक्री करू नये.

अशी विनंती दारूबंदी आंदोलन व वारकरी संघाच्या वतीने अकोल्यातील सर्व सुपर मार्केट चालकांना केली. येथील सर्व सुपर मार्केट चालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत,

वाईन विक्रीला ठेवणार नसल्याचे जाहीर करत लवकरच व्यापारी असोसिएशन याबाबत एकत्र येऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.सुपर मार्केटबाहेर सुरुवातीला जनतेसमोर या वाईन विक्रीला विरोध का? ही भूमिका मांडण्यात आली.

हेरंब कुलकर्णी यांनी बदनाम असलेल्या दारूला किराणा दुकानात आणून समाजमान्यता देण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगून वाईन म्हणजे दारू नाही.

असे सरकार सांगत असेल तर वाईन विक्रीला उत्पादनशुल्क विभागाचा परवाना मग कशासाठी लागतो? असा प्रश्न विचारला. आज सुपरमार्केट मध्ये सरकार समाजातील विरोधाचा अंदाज घेत आहे.

व पुढे तीच दारू ते किराणा दुकानापर्यंत नेतील. त्यामुळे आजच विरोध करण्याची गरज आहे.दीपक महाराज देशमुख यांनी समाजातील तरुण मुलांना व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय असल्याने वारकरी संप्रदायाचा व अगस्ती देवस्थानाचा या निर्णयाला विरोध आहे.

सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास वारकरी व कीर्तनकार आंदोलन करतील अशी भूमिका मांडली. आम्ही प्रबोधन करायचे आणि सरकारने समाज व्यसनी करायचा असे सुरू असल्याची खंत व्यक्त केली.

दारूबंदी आंदोलनाचे अध्यक्ष संतोष मुतडक यांनी समाजाला दारू पाजून तिजोरीचे उत्पन्न वाढवण्याची सरकारची नीती समाजाच्या हिताला घातक असल्याचे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts