महाराष्ट्र

रझा आकादमीतर्फे मुंबईत मशिदीबाहेर निदर्शने, केली ही मागणी…

Maharashtra news : जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबवण्यासाठी रझा आकादमीतर्फे मुंबईतील मिनारा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी करण्यात आली.

आम्ही सर्वजण काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे असल्याचे रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नूरी यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंना दहशतवादी हल्ल्यांच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांनी स्थलांतर सुरू केले आहे.

एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल एक हजार ८०० पंडितांसह तीन हजारांहून अधिक हिंदूंनी काश्मीर सोडले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आम्ही काश्मीर पंडितांच्या पाठिशी आहोत, त्यांच्यासाठी हवे ते करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर आता रझा आकादमीतर्फेही हा विषय उचलून धरण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts