Pune-Mumbai Expressway News:- जर तुम्ही मुंबई ते पुणे या द्रुतगती मार्गावर प्रवास करणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आज बारा ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीमध्ये मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
या संदर्भात एमएसआरडीसी कडून माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई ते पुणे द्रूतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून गॅन्ट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसी कडून केले जाणार आहे व त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर राहणार दुपारी 12 ते 2 या कालावधीत वाहतूक बंद
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे कडे जाणाऱ्या मार्गीकेवर 35/500 या ठिकाणी गॅन्ट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून सुरू आहे व त्यामुळे आज बारा ते दोन या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
कसा राहणार या कालावधीत वाहतुकीचा प्लान?
या कालावधीमध्ये मुंबई कडून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने या मार्गाच्या किमी 0.8/200 येथील शेडुंग फाटा येथून वळवून रा.म.मा.क्र. 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून दृतगती मार्गाच्या मॅजिक पॉईंट कि.मी.42/100 येथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहेत.
तसेच गॅन्ट्री बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी दोन वाजता या मार्गावरील मुंबई कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील एमएसआरडीसीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शक्य असेल तर दुपारी बारा ते दोन या वेळेत या महामार्गावरून प्रवास करणे टाळावे असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा द्रुतगती महामार्ग असल्यामुळे या ठिकाणहून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या अनुषंगाने हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार असल्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे देखील आवाहन एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.