महाराष्ट्र

Pune-Nashik High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात ‘ही’ आहे महत्त्वाचे अपडेट! करण्यात येत आहे महत्त्वाचा बदल

Pune-Nashik High Speed Railway:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले नासिक या दोन शहरे व त्यासोबतच महाराष्ट्रातील अहमदनगर सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यासाठी खूप उपयुक्त असलेला पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा बऱ्याच दिवसापासून चर्चेत असून या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिक या दोन शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवून दळणवळण तसेच कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला खूप मोठा फायदा होणार आहे.

परंतु बऱ्याच दिवसापासून हा प्रकल्प अनेक गोष्टींमुळे रखडत असून अजून देखील या प्रकल्पाच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीची प्रगती होताना दिसून येत नाही. या प्रकल्पाबाबतीत अनेक बैठका देखील झाल्या तसेच केंद्र सरकारकडे याबाबतीत पाठपुरावा देखील करण्यात आला व आता कुठे या पुणे येथे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्यात आलेले आहे.

नुकतीच यासंबंधीची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती व यामध्ये या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेले होत्या. तसेच भूसंपादनाच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील त्या देखील दूर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिलेले होते. ही सर्व प्रक्रिया आता सुरू झाली असतानाच मात्र त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.

 ही आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे बाबत अपडेट

या रेल्वे मार्गाचा जो काही प्रस्ताव आहे तो मध्य रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला होता व त्यामध्ये काही त्रुटी आढळून आले असल्याचे समोर आले आहे व त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला गेलेला नाही. या पाठवलेल्या प्रस्तावामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्याकरिता मध्य रेल्वे कडून काम करण्यात येणार असून जेव्हा या त्रुटी दूर केल्या जातील तेव्हा नवीन प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे व त्यानंतरच या हायस्पीड रेल्वे मार्गाचा अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे.

त्रुटी दूर करून जो काही अंतिम आराखडा पाठवला जाईल तो रेल्वे बोर्ड आणि पीएमओला मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाला गती येईल अशी तरी सध्या शक्यता आहे. यासोबतच या प्रकल्पातील काही अडचणींचा विचार केला तर पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग हा अहमदनगर जिल्ह्यातून जात  असून नगर जिल्ह्यात असलेल्या खोडद या ठिकाणी असलेल्या जीएमआरटी प्रकल्पाच्या महाकाय दुर्बीण प्रकल्पाजवळ हा मार्ग जात आहे. यासंबंधी देखील काही अडचणी असून त्यावर अद्याप पर्यंत तोडगा निघालेला नाही. यामध्ये जी काही अडचण येत आहे ती दूर झाल्यानंतरच या ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे.

 पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचे स्वरूप कसे आहे?

पुणे ते नाशिक या हायस्पीड रेल्वेमार्गाचे एकूण अंतर 235 किलोमीटर असून या मार्गावर 18 बोगदे आणि 19 उड्डाणपूलांचा समावेश आहे. या मार्गावर दोनशे किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे व संपूर्णपणे या मार्गाचे विद्युतीकरण झाले असून हा दुहेरी मार्ग आहे.

या मार्गावर पहिल्या टप्प्यामध्ये सहा कोचची रेल्वे धावणार असून त्यानंतर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. या मार्गावर वीस स्टेशन असणार असून प्रकल्पाकरिता 16039 कोटी पर्यंत खर्च येणार आहे. या सेमी हायस्पीड रेल्वे चा फायदा म्हणजे पुणे ते नाशिक या शहरा दरम्यानचा प्रवास अवघा एक तास 45 मिनिटात करता येणार आहे.

Ajay Patil

Recent Posts