Pune Ring Road:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये जी काही वाहतूक कोंडीची समस्या आहे ती दूर होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या महत्त्वाच्या अशा प्रकल्पाचे दोन टप्प्यामध्ये काम करण्यात येणार असून त्याचे पश्चिम आणि पूर्व असे दोन टप्पे करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पासाठी जे काही आवश्यक जमिनीची आवश्यकता आहे ती जमीन संपादन अर्थात भूसंपादन प्रक्रिया आता वेगात राबविण्यात येत
असून या रिंग रोडच्या पश्चिम मार्गावरील जमिनीचे जवळपास 65 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. त्यासोबतच पूर्व मार्गावर देखील भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टिकोनातून सदर गावातील स्थानिकांना नोटीस देऊन भूसंपादनाची कार्यवाही वेगात सुरू करण्यात आली आहे.
सध्या काय आहे भूसंपादनाची स्थिती?
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पश्चिम टप्प्यातील जो काही मार्ग आहे त्या ठिकाणी रिंग रोडची रचना बदलण्यात आलेली होती व त्यामुळे तीन गावांची भूसंपादनाची प्रक्रिया काहीशी रखडली होती. परंतु आता त्याबाबत कार्यवाही करण्यात आली असून पश्चिम मार्गावरील 631 हेक्टरचे निवाडे जाहीर करण्यात आले असून एकूण 631 हेक्टरमध्ये 260 हेक्टर जमिनीचे निवाडे संमतीने करण्यात आले आहेत तर उरलेल्या 370 हेक्टर क्षेत्राचे निवाडे सक्तीने करण्यात येऊन भूसंपादन आता करण्यात आलेली आहे.
त्यासोबतच पूर्वेकडील मार्गावरील 46 गावांमध्ये जे काही बाधित आहेत त्यांना देखील आता भूसंपादनासाठीच्या नोटीसा देण्यात आल्या असून दिलेल्या मुदतीनुसार ताबडतोब पुढील कार्यवाही करण्यात आली असल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.
या प्रकल्पाच्या पश्चिम मार्गाकरिता महाराष्ट्र सरकार संपादित करत असलेल्या जमिनीकरिता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भरपाईचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत व त्या माध्यमातून प्रती हेक्टर 3.7 कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. पश्चिम मार्गावरील 32 गावांमधील 631 हेक्टर पैकी 343 हेक्टर म्हणजेच 65 टक्के जागा ताब्यात घेण्यात आली आहे.
हे जानेवारी महिन्याच्या शेवटी पर्यंत उरलेल्या 710 हेक्टर जागेचा ताबा घेऊन संपूर्ण 1560 एकर जागेचा ताबा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याकरिता राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला 1700 कोटी रुपये दिले असून त्यातील पंधराशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे
व उरलेले 200 कोटी रुपये शिल्लक असून नवीन 1000 कोटींची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
बांधकामाला कधी होणार सुरुवात?
हा जो काही 172 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रकल्प आहे तो मार्च एप्रिल 2024 मध्ये सुरू होणार असून कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून व होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. भूसंपादन जवळ जवळ आता पूर्ण होण्याच्या दिशेने असून या महिन्यात त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल व हा प्रकल्प पुणे ते बेंगलोर, पुणे ते नाशिक, पुणे ते मुंबई, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर आणि पुणे- सासवड- पालखी मार्ग या प्रमुख महामार्गांना जोडला जाणार आहे
रिंग रोडचे हे आहेत प्रमुख चार टप्पे
1- टप्पा पहिला– थेऊर फाटा – एनएच 65- केसनांद- वाघोली-चाहोर्ली- भावडी- तुळापूर- आळंदी- केळगाव- चिंबळी
2- टप्पा दोन– NH 60- चिंबळी मोई- निघोजे- सांगुर्डे- शेलारवाडी- चांदखेड- पाचणे- पिंपोली- रीहे- घोटावडे- पिरंगुट फाटा
3- टप्पा तीन– पिरंगुट फाटा- भुगाव- चांदणी चौक- आंबेगाव- कात्रज
4- टप्पा 4- आंबेगाव- कात्रज- मांगडेवाडी- वडाचीवाडी- होळकरवाडी- वडकी नाका- रामदरा- थेऊर फाटा- एन एच 65