विनामास्क फिरणाऱ्यांवर पारनेर मध्ये दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पारनेर नगरपंचायतीच्या वतीने व पारनेर पोलिसांच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.

त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या १० जणांवर पारनेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर पारनेर शहर व परिसरातील ३३ जणांकडून १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पारनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सविता कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली असुन यापुढील काळात ही कारवाई चालू ठेवली जाणार आहे.

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण परिसरात तसेच कान्हुर पठार, भाळवणी, सुपा या मोठ्या गावांमध्ये विनामास्क फिरणारे व कोरोना काळात नियम मोडणाऱ्या १०० जणांवर कारवाई करून

गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी व उपपोनि. प्रमोद वाघ यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसात पारनेर पोलीस ठाणे व नगरपंचायत पारनेर यांच्या संयुक्त मोहिमेने केलेल्या कारवाईत विनामास्क तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या १० गुन्हे दाखल करण्यात

तर एकूण ३३ जणांवर दंडात्मक कारवाई करून १६ हजार ५०० रुपयाचा दंड करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts