महाराष्ट्र

Punjab Election Update : पंजाबमध्ये काँग्रेसचा धोबीपछाड, आपची जल्लोषाला सुरुवात; विजय स्पष्ट दिसतोय

चंदिगढ : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे (election results) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP) मोठी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचे सेलिब्रेशन (Celebration) देखील आपने सुरु केले आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झाला आहे.

निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ८९ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १६ जागांवर आघाडी घेतली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना देखील यावेळी जनतेने नाकारले की काय असा असा प्रश्न निर्माण होत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) हे पटियालामधून पिछाडीवर आहेत.

त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आपचे उमेदवार अजीत पाल हे या मतदारसंघामधून तब्बल दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू हे देखील दोन हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आपचे उमेदवार जीवन ज्योती कौर यांनी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, आपने पंजाबमध्ये बाजी मारली आहे. तब्बल ८९ जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Renuka Pawar

Recent Posts