महाराष्ट्र

Railway Recruitment 2023 : तरुणांना मोठी संधी ! 10वी, ITI प्रमाणपत्र असेल तर लगेच रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; करा असा अर्ज

Railway Recruitment 2023 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे.

त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीची स्वप्ने बाळगत असाल तर ही तुमच्यासाठी मोलाची संधी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जाणून घ्या की कोणत्या ठिकाणी व कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

भारतीय रेल्वेने बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), कार्मिक विभाग, बिलासपूर विभागात शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार या पदांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 03 जून किंवा त्यापूर्वी secr.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यामध्ये रेल्वे भरती 2023 अंतर्गत एकूण 548 पदे भरण्यात येणार आहेत.

रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित ट्रेडमधील ITI सह इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

रेल्वे भरती साठी महत्वाच्या तारखा

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सादर करण्याची तारीख 03 मे 2023 पासून सुरु झाली आहे. तुम्ही या पदांसाठी 03 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर विहित नमुन्यात अर्ज करू शकता.

रेल्वे भरतीसाठी भरल्या जाणार्‍या पदांचा तपशील
एकूण पदे – 548

येथे अर्ज करण्यासाठी लिंक आणि अधिसूचना पहा

रेल्वे भरती 2023 साठी अर्जाची लिंक
रेल्वे भरती 2023 साठी अधिसूचना

रेल्वे भरती साठी वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै रोजी किमान 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. याशिवाय नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts