मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून त्याचे पडसात महाराष्ट्रात (Maharashatra) दिसत आहे, तसेच या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात देखिल वाद पेटत आहे.
याबाबत बोलताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार व महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले असून राज ठाकरेंचे मात्र कौतुक केले आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन आहे.
हिंदुत्वाला फुंकर घालण्याचा काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल, असे सदाभाऊ यावेळी म्हणाले आहेत.
तसेच गेल्या लोकसभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे (Ncp) सगळे नेते हे टाळ्या वाजवत होते, आणि आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरायला लागलेल्याची बोचरी टिका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.
दरम्यान, शुक्रवारीही सदाभाऊ खोत यांनी सिंधुदुर्गातून राष्ट्रवादीला टार्गेट केले होते. राष्ट्रवादीने लुटावं कसे हे शिवकवण्यासाठी एक विद्यापीठ खोलावं, जगभरात लोक या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी येतील, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला होता.