राम शिंदे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कोणी बंगला व कार्यालयासाठी भांडत आहे. तर, काही मंत्री खात्यासाठी अडून बसले आहे. एका बंगल्याचे दोन-दोन दावेदार आहेत, अशा स्थितीत असलेले राज्यातील नवे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही’, असा दावा भाजपचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला.

सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, प्रत्येक निर्णयाला विलंब होत आहे. सरकार आल्यानंतर तब्बल ८५ दिवसांनी जिल्ह्यात पालकमंत्री येत आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांनी तेथे भेटी दिल्या. बैठकाही घेतल्या. पण आपल्याकडे कोल्हापूरचे असलेले पालकमंत्री अजून आलेले नाहीत,’ अशी टीकाही त्यांनी केली.

शिंदे म्हणाले, ‘भाजपने मागील पाच वर्षांत नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वर्चस्व प्रस्तापित केले आहे. नगरपालिका, नगर पंचायत तसेच अनेक ग्रामपंचायती, महापालिका व पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पक्षामध्ये संघटनात्मक काम करण्याची मोठी संधी आहे. नवे पदाधिकारी पक्ष वाढीसाठी पुरेपूर योगदान निश्चितच देतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title – Ram Shinde says the mahavikasaghadi will not survive!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts