राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होणारा ‘तो’ कार्यक्रम रद्द !

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीनिमित्त शहरातून शस्त्रपूजन उत्सव घेऊन पथसंचलन काढले जाते.

मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शस्त्रपुजनाचा उत्सव व पथसंचलनाचा कार्यक्रम रद्द केला आहे, अशी माहिती दक्षिण नगर जिल्ह्याचे संघचालक डॉ. रवींद्र साताळकर आणि जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी दिली.

विजयादशमीनिमित्त नागपूर येथे होणारा उत्सव व सरसंघचालक मोहन भागवत यांचे विचार सर्व समाजाने परिवारासह ऑनलाइन पहावे यासाठी स्वयंसेवकांनी योजना करावी, असे आवाहन श्रीकांत जोशी यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts