महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत व त्यासोबतच काही रेल्वेमार्ग प्रकल्पांचे काम देखील प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचे महत्त्व आहेच.
परंतु कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील हे प्रकल्प खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. यातीलच जर आपण पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड या रेल्वे मार्गाचा विचार केला तर हा रेल्वेमार्ग महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले शहर नाशिक आणि अहमदनगर या शहरांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा प्रकल्प आहे.
या प्रकल्पाचे काम मात्र काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया मागील काही दिवसा अगोदर सुरू देखील करण्यात आलेली होती. परंतु निधी अभावी ही प्रक्रिया देखील सध्या थांबलेली आहे.
त्यातच आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्यामुळे या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्गाला चालना मिळाली असून या रेल्वे मार्गाचा अगोदरचा जो काही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात डीपीआर होता त्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दूर करून नवीन सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीकरिता आता केंद्राच्या रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आलेला आहे.
नासिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा सुधारित डीपीआर मंजुरीसाठी सादर
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षांपासून बहुचर्चेत असलेल्या नासिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा रखडलेल्या अवस्थेत असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र आता त्याला चालना मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या रेल्वे मार्गासाठीचा अगोदरचा जो काही डीपीआर होता त्यामधील त्रुटी दूर करून आता मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तब्बल 17,889 कोटींचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरी करिता केंद्राच्या रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आलेला आहे.
जर आपण यापूर्वीचा डीपीआर पाहिला तर तो 16,039 कोटी रुपयांचा होता. परंतु यामध्ये काही त्रुटी होत्या व आता त्यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून दूर करण्यात आल्याने नवीन परिपूर्ण असा सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला गेल्यामुळे या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला लवकरच अंतिम मान्यता मिळणार असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
कसा आहे हा सुधारित डीपीआर?
नासिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाकरिता 17889 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून एकूण खर्चापैकी बांधकामावर तब्बल 15,410 कोटी, इलेक्ट्रिक कामांवर 1379 कोटी, सिंगल अँड कम्युनिकेशनच्या कामाकरिता 1086 कोटी तर मेकॅनिकल कामांसाठी साडेबारा कोटी रुपयांचा खर्च यामध्ये अपेक्षित आहे. हा रेल्वे मार्ग तब्बल 233 किलोमीटर लांबीचा असून साधारणपणे पाच वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.