सर्वात मोठी बातमी : अखेर राज्यात लॉकडाउनची घोषणा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

विकेंड लॉकडाऊन जाहीर :- राज्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कठोर निर्बंध लागू  :- रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी :- मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून … :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल.

वेळा ठरविण्यात येणार  :- उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत.  कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.

चिंता वाढली! २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण

करोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

त्याचबरोबर २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts