महाराष्ट्र

नीरा कालवा समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- कालवा सल्लागार समितीची बैठकीत नुकतीच पार पडली त्यात नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नीरा दोन्ही कालव्यातून सध्या पाण्याचे आवर्तन हे सुरु आहे. शिवाय याला जोडूनच आणखी एक पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाल्याने ३० जून पर्यंत शेतीसाठी सलग दोन आवर्तने दिली जाणार आसून

बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा, पंढरपूर, माळशिरस या परिसरातील शेतकऱ्यांची याचा फायदा होणार आहे.तर उन्हाळी दिवसांमधील पाण्याची गरज आता पूर्ण होणार आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकी दरम्यान सोलापूर जिल्हा पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार राम सातपुते, समाधान आवताडे, अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील शेळके

पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts