महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती… पावसाबाबत आली महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  प्राथमिक अंदाजात यंदा संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस पडेल अशी माहिती ‘स्‍कायमेट’ या संस्थेने दिली आहे. दरम्यान ही संस्‍था २०१२ पासून मान्‍सूनचा अंदाज व्‍यक्‍त करते.

मागील ९ वर्ष मान्‍सूनचे अंदाज हे सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्‍यात व्‍यक्‍त केले जातात. यंदाही एप्रिल महिन्‍यातच २०२२ च्‍या मान्‍सूनचे सविस्‍तर अंदाज व्‍यक्‍त करणार आहे.

असे या संस्‍थेने म्‍हटलं आहे. सध्‍या संस्‍थेकडून मान्‍सूनचे प्राथमिक आकड्यांची नोंद करत आहे. त्‍यामुळे आता जाहीर केलेली अंदाज हा प्राथमिक आहे.

मागील काही वर्षांमध्‍ये मान्‍सूनचे आगमन, तीव्रता, कालावधी यामध्‍ये मोठे बदल होत आहेत. मात्र यंदा मान्‍सून सरासरी ९७ ते ते १०४ टक्‍के राहिल, असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

यासंदर्भात माहिती देताना स्‍कायमेटच्‍या जी. पी. शर्मा यांनी सांगितले की, यंदा मान्‍सून सामान्‍य राहणार आहे”. प्रशांत महासागरातील तापमानाची नकारात्‍मक स्‍थिती कमी होताना दिसत आहे.

प्रशांत महासागरामधील परिस्‍थिती या वर्षी सामन्‍य पाऊस पडेल, असे संकेत देत आहे. मागील १५ वर्षांपासून स्‍कायमेटकडून हवामानाचे विश्‍लेषण केले जाते.

हे अंदाज महाराष्‍ट्र सरकार, गुजरात सरकार यांच्‍यासह एनएसडीएमए, एसबीआय, यूएसएआयडी, रिलायंस इंफ्रा, वर्ल्ड बँक एडीएफसी, ईआरजीओ, आयएफसी, कृषी विमा महामंडळ, आयसीआयसीाय आदी कंपनींच्‍या नियोजनात महत्‍वाची भूमिका बजावतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Farmers news

Recent Posts