अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी एक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्ये फटाके वाजवू नये,
फटाके वाजविल्यामुळे होणा-या प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुफ्फुसावर विपरित परिणाम होवू शकतो त्यामुळे कोरोना रूग्ण व सर्व सामान्य नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
फटाके वाजवल्यामुळे शहरामध्ये मोठया प्रमाणात प्रदूषण होईल यादृष्टिने फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी. यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.
तसेच नागरिकांनी बाजार पेठेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व गर्दी असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. तसेच शहर वासियांना दिवाळी सणा निमित्त हार्दिक शुभेच्छा देवून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन मा.महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.
दरम्यान सध्या दिवाळी उत्सवामुळे बाजार पेठेत मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
तसेच नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही तर मनपास दंडात्मक कारवाई करावी लागेल. असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved