बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी बाळ बोठेस कोर्टाचा दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी आरोपीला कोर्टासमोर हजर ठेवावे ही तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे.

त्यामुळे बोठे याला कोर्टात उपस्थित राहण्याची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या (१५ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.

या दिवशी जामीन अर्जावर पोलीस तपास यंत्रणेचे व सरकारी वकिलांचे कोर्टाने म्हणणे मागविले होते.त्यात पोलिसांनी पुढील सुनावणीच्या वेळी बाळ बोठे यानी कोर्टात उपस्थित राहण्याचा अर्ज न्यायालयात दिला होता, या अर्जावर आणि अटक पूर्व जमीन देण्याच्या मुद्द्यावर आज झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. नातू यांनी निकाल राखून ठेवला होता.

निकाल देतांना न्यायमूर्ती नातू यांनी उद्या मंगळवार दि.१५ रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले तर बाळ बोठे ला उपास्थित राहण्याच्या अर्जावर निकाल देतांना अनुपस्थित राहिल्यास हरकत नाही असा शेरा मारला.

बाळ बोठेच्या वतीने ॲड.महेश तवले यांनी बाजू मांडली तर सरकारी वकील म्हणून ॲड.सतीश पाटील यांनी बाजू मांडली . पोलिसांच्या वतीने बाजू मांडतांना ॲड.सतीश पाटील यांनी गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपीने स्वतः कोर्टात हजार राहणे गरजेचे आहे असा मुद्दा मांडला तर ॲड.तवले यांनी आरोपीस कोर्टात हजर राहण्यासंदर्भात पोलिसांनी कोणतेही ठोस कारण दिलेले नाही असा युक्तिवाद केला.

त्यावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर न्या.नातू यांनी निकाल राखून ठेवला होता. नंतर बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याचे सांगतानाच बाळ बोठे याला सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्यास परवानगी दिली.यामुळे आरोपी बाळ बोठेस काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts