RBI News :- सध्या भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. अनेकदा असे दिसून आले आहे की बँका आरबीआयचे नियम आणि सूचनांचे पालन करत नाहीत,
ज्यामुळे त्यांना दंडाला सामोरे जावे लागते. आता पुन्हा एकदा काही बँकांना आरबीआयकडून दंडाला सामोरे जावे लागणार आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल…
सूचनांचे पालन न केल्यास दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल युनियन बँक ऑफ इंडिया, आरबीएल बँक आणि बजाज फायनान्स लिमिटेडला दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) युनियन बँक ऑफ इंडियाला (यूबीआय) ‘लोन अँड अॅडव्हान्स – वैधानिक आणि इतर निर्बंध’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
किती लावला दंड
दुसऱ्या आदेशात केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, मार्गदर्शक तत्त्वे (खाजगी क्षेत्रातील बँकांमधील शेअर्स अधिग्रहण किंवा मतदानाचा अधिकारासाठी पूर्व अनुमोदन) मार्गदर्शक तत्त्वे 2015 चे पालन न केल्याबद्दल खासगी क्षेत्रातील
आरबीएल बँक लिमिटेडला 64 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एनबीएफसीमधील घोटाळ्यांवर लक्ष ठेवण्याच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बजाज फायनान्स लिमिटेडला साडेआठ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या बँकेचे विलीनीकरण
दरम्यान, मध्यवर्ती बँकेने असेही सांगितले की त्यांनी अहमदाबादस्थित सुविकास पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ’द कालुपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, अहमदाबादमध्ये विलीन करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.
ही योजना 16 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सुविकास पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या शाखा 16 ऑक्टोबरपासून कालुपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा म्हणून काम करतील.