अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Maharashtra News :-राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अपक्षेप्रमाणे त्यांनी राजकीय पदाचा राजीनामा दिला.
आता त्यांच्या जागी पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे. अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांचे नाव यासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.
मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी चाकणकर यांची या पदावर निवड झाली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष या अर्धन्यायिक पदावर त्यांची नियुक्ती झाली.
त्यामुळे त्या राजकीय पद सोडणार का? याकडे लक्ष लागले होते. मधल्या काळात ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळू शकणारी महिला कार्यकर्ती पक्षात दिसत नव्हती. आता रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे.